निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग १

  • 7.9k
  • 4.3k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग १" माधवी ऐ माधवी"पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने तीन चारदा बेल वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी ऊघडते.घरात अजून दुसरं कोणी नाही. पंकज आणि माधवी दोघच असतात.पंकजच्या स्कूटरचा आवाज माधवीला त्यांच्या घरातील बाल्कनीत येतो. पंकज घरी यायच्या आधी माधवी नेहमीच बाल्कनीत उभी राह्यची. पंकजला पार्किंग मध्ये गाडी ठेवताना बघीतलं की माधवी घराचं दार उघडून ठेवत असे.हा माधवीचा रोजचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आज काही घडलं नाही त्यामुळे मनाशी आश्चर्य करत पंकज स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला आता शिरला तर घरात सगळीकडे त्याला अंधार दिसला." आज झालं काय