मल्ल प्रेमयुद्ध - भाग 19

  • 6k
  • 3.7k

मल्ल प्रेमयुद्ध क्रांती आल्यानंतर रूममध्ये बसून उगीचच बॅगमधले कपडे इकडे तिकडे करत होती. रत्ना आणि चिनू तिची होणारी घालमेल बघत होत्या."वहिनी काय हो खरच मस्त हाय ती स्वप्नाली. सुंदर दिसती आणि शिक्षण पण किती झालय! लट्टू हाय बर दाजींच्या माग... अजून पण तिला वाटतय दाजी तायडीला सोडून तिच्या बर लग्न करतील." चिनू अन रत्ना तिच्याकडे तिरक्या नजरेन बघत होत्या."व्हय ना आणि मला वाटतय तेजश्री ताईच्या पण मनात स्वप्नाली त्यांची जाव असावी असं वाटतं... न्हाय का चिनू त्या दोघी कितीवेळ गप्पा मारत होत्या. इकडं आल्यापासन तेजुवहिनी आपल्याबर बोलायच्या पण कमीच झाल्यात." क्रांतिने बॅगची चैन जोरात लावली. न कळत तिच्या डोळ्यात पाणी