निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ४मागच्या भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला दत्तक मुलीबद्दल सांगतो.आता पंकजचे बाबा माधवीला काय सांगतात बघू.पंकज आणि माधवी पंकजच्या आईबाबांकडे गेले. पंकजचे आईबाबा आणि मोठा भाऊ प्रसाद, अंजली त्याची बायको आणि दोन मुलं नेहा आणि रिया असे सगळे एकत्र रहात. पंकजचं लग्न झाल्यावर आहे ते घर सगळ्यांसाठी अपुरे पडू लागल्याने पंकजच्या बाबांनीच पंकजला वेगळं रहावं असं सुचवलं.माधवीला खरतरं इथं राह्यला आवडायचं पण अंजली वहिनींनी माधवीला समजावून सांगितले.वहिनी म्हणाली," माधवी तात्पुरते तुम्ही दुसरीकडे भाड्याने रहा. हे घर लहान पडतं. तुमचं नवीनच लग्न झालंय तेव्हा जरा मोकळे रहा. माझं लग्न झाल्यावर हे घर पुरायचं आता रिया आणि नेहा