निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ८मागील भागात आपण बघीतलं की पंकजने राजेश कडून दत्तक प्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या.आता पुढे काय होईल ते बघूराजेश ने सांगितल्याप्रमाणे पंकजने काराच्या साईटवर जाऊन नाव रजीस्टर केलं आणि त्यांच्या गावात असलेल्या दोन दत्तक केंद्रापैकी ' माऊली' या केंद्राचं नाव निवडलं.दोन दिवसांनी माऊली या दत्तक केंद्रामधून पंकजला फोन आला" हॅलो"" पंकज बोलताय?"" हो."" तुम्ही बाळ दत्तक हवंय यासाठी काराच्या साईटवर नाव रजीस्टर केलंय?"" हो मॅडम. दोन दिवसांपूर्वी केलंय."" तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी कागदपत्रं जमा करा."" काय लागेल?"" हा तुमचा व्हाॅट्स ॲप चा नंबर आहे का?"" हो." पंकज म्हणाला." ठीक आहे. मी या नंबरवर कोणती