निळ्या आकाशाचं स्वप्नं - अंतिम भाग

  • 4.1k
  • 2k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ९ ( अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की पंकजने काराच्या साईटवर आपलं नाव रजीस्टर केलंय. पुढे काय घडलं बघू.काराच्या साईटवर नाव रजीस्टर करून आता जवळपास दीड वर्ष झालं होतं. पंकज आणि माधवीचा रोजचा दिवस हा काराकडून येणाऱ्या फोनची वाट बघण्यात जायचा. माधवी आता पूर्वीसारखी निराश होत नसे कारण तिला कळलं होतं की आज नाही तर ऊद्या आपल्या घरी बाळ येईल.पंकजला ही आता माधवीची पूर्वी सारखी काळजी वाटत नसे. पूर्वी पंकज घरी आला की माधवी खूप वेगळ्या मूडमध्ये दिसत असे त्यामुळे ऑफीसमध्येही पंकजच्या मनात माधवीचाच विचार चालू असे.***पंकज आणि माधवीची प्रतिक्षा एके दिवशी संपली त्यांना 'सुखदा '