किस्से चोरीचे - भाग 2

  • 5.6k
  • 3.4k

किस्से चोरीचे... त्यावेळी मी जेमतेम आठ नऊ वर्षांचा असेन.त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आमच्या गावाच्या पंचक्रोशीत दरोडेखोर आणि किरकोळ चोरट्यांचीही बरीच हवा झाली होती.आजूबाजूच्या गावांत दररोज कुठे ना कुठे दरोडा पडल्याच्या बातम्या यायच्या. "काल कांबळवाडीत चोर घुसले होते" "परवा टोणपेवाडीत चोरट्यांनी मारहाण करून घर लुटले""पहाटे चोरटे आपल्या गावाच्या रस्त्यावर ट्रक घेऊन आले होते त्यांच्याकडे लाठ्या काठ्या आणि गोफणी होत्या" किंवा "ते चोरटे फक्त चोऱ्याच करत नाहीत तर लोकांना बेदम मारहाणही करतात." अशा बातम्या कुठून कुठून यायच्या आणि त्या बातम्यांमुळे गावात आणि वाड्या वस्त्यांवर सगळे लोक चांगलेच घाबरायला लागले होते.अंधार पडायच्या आत सगळे लोक घरी परतायला लागले होते. लोकांच्या बोलण्यात सतत चोरटे आणि