किस्से चोरीचे - भाग 4

  • 4.3k
  • 2.2k

त्या काळी मी पुण्यातल्या वडगावशेरी गावात रुके चाळीत रहायला होतो आणि माझा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. मी पुण्यात रहात असलो तरी वेगवेगळ्या निमित्ताने पुण्याहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गावी अधूनमधून अगदी सह कुटुंबं जात असे. हा प्रसंग घडला तेव्हा अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमसाठी मला माझ्या गावाकडच्या भावाकडून बोलावणे आले होते.घरातला अत्यंत महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असल्याने तो अटेंड करणे मला आवश्यक होते.त्या काळी गावाकडे जायला एस टी अर्थात आपल्या लालपरी शिवाय दुसरा पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता आणि त्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर जायला लागलायचे. गावाकडच्या त्या कार्यक्रमाला मी माझी पत्नी आणि माझा दोन वर्षे वयाचा मुलगा असे आम्ही तिघे जाणार