मल्ल प्रेमयुद्ध - भाग 22

  • 5.4k
  • 3.8k

मल्ल प्रेमयुद्धपहाटे 4 चा अलार्म वाजला. क्रांती तयार झाली आणि उठून पटापट सगळे आवरून पळायला. तेलणीच्या पठारावर गेली. दहा राऊंड झाल्यावर थोडी बसली अन लगेच एक्सररसाईझ करायला सुरुवात केली. तेवढ्यात मागून आवाज आला."मला ठाव व्हत तू थांबणाऱ्यातली पोरगी न्हाईस. मला तगाव व्हत तू येणार...म्हणून मी..." उस्ताद बोलता बोलता थांबले."म्हणून तुम्ही रोज येत व्हता... आणि माझी वाट बघत व्हता." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले."व्हय... मला रोज वाटत व्हत तू येणार... मला वाटत तू आता इथंच न थांबता पुढं जावं... शहरात चांगल्या ठिकाणी कोचिंग लावावी. मी काय गावातला पैलवान आता तुला कोणीतरी असा कोच पाहिजे जो मोठ्या मोठ्या स्पर्धेत कस खेळतात हे शिकवील.."