सख्या रे - भाग 6 - अंतिम भाग

  • 5.2k
  • 2.8k

भाग – ६ मग थोड्या वेळाने मितालीने स्वतःला सावरले आणि ती आता सुमितकडे चेहरा करून बोलली, “ सख्या रे तू हे आजवर का नाही बोललास, हि गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बर इतका उशीर केलास. अरे तुझ्या कॉल न उचलणे हा माझ्या कडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे . तू बोललास त्याचप्रमाणे माझ्या हि राग अनावर झाला होता आणि मी रागाचा भारात हे सगळ कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते कि माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती