किस्से चोरीचे आपण चोरी म्हटले की साधारणपणे कोणत्या तरी महत्वाच्या किंमती वस्तूची चोरी असे गृहीत धरतो;पण चोरी फक्त वस्तूचीच होते असे नाही. तर अशाच एका वेगळ्या प्रकारच्या चोरीबद्दलचा हा किस्सा मी सांगणार आहे... त्यावेळी नोकरीत माझे नुकतेच पहिले वाहिले प्रमोशन झाले होते आणि पुण्यातील कॅम्प विभागातल्या जुन्या टेलिफोन लाईन आणि केबल नेटवर्कचे अपग्रेडेशन अर्थात नूतनीकरण करायचे महत्वाचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. या कामात नवीन केबल टाकणे जुनी संसाधने बदलून नवी बसवणे टेलिफोन नादुरुस्त होण्यासाठी कारणीभूत असलेली तांत्रिक कारणे कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करून निरीक्षणासाठी नेमलेल्या विशेष विभागाकडून प्र माणि त करून घ्यायचे अशा प्रकारचे काम माझ्यावर सोपवले