भ्रृणहत्या

  • 4.2k
  • 1
  • 1.5k

भ्रृणहत्या(कादंबरी) अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५० मुल पाहिजे हो अशी आर्त हाक काही लोकांची ऐकायला येत असते.काही जण तडफडत असतात मुलं व्हावी म्हणून.पण त्यांना मुलं होत नाही.मग मुलं व्हावी म्हणून देवाला नवश कबूल करणे सुरु असते.अशातच एखाद्या वेळी ती घटना झालीच आणि मुल झालंच.तर त्या घटनेस देव पावला असं समजून मग हा नवश पूर्ण करण्यासाठी ज्या देवासाठी तो नवश केला,तो नवश पूर्ण करतांना देवाला कोंबड्या बक-याचा बळी देण्याची प्रथा.ज्या कोंबड्या बक-याचा काहीही दोष नाही.काही लोकं नवश म्हणून कानोबा मांडू,फुलोरा ठेवू.गणपती मांडू.तरीही हे नवशं पूर्ण होत नाहीत.अर्थात मुलंच होत नाहीत.मग शेवटी हा भाग नशीबावर सोडून आपल्या नशीबातच नाही असं समजून लेकरु होण्याचं