मनोगत हरळ्या हा चांभार समाजातील पहिला संत होवून गेला,जो संत रविदासाच्या जन्माच्या चारशे वर्षापुर्वी जन्मला.त्यांनीही कवने रचली.पण वचनभंडाराला आग लावून त्यातील काही साहित्य समाप्त केलं गेलं.त्यांनीही आपल्या कवनातून समाजातील भेदभाव, रुढी,परंपरा,चालीरीतीवर जोरदार हल्ला चढविला.काही चांभारसमाजातील मंडळींना हरळ्या,ककैय्या कोण हे अजूनही माहीत नाही.त्यांचे बलिदान माहीत नाही.तसेच आपल्याही समाजात रविदासापुर्वी एक महान संत हरळ्याच्या रुपाने होवून गेला हे शोधण्याचा तसेच जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करीत नाहीत.खरंच हरळ्या आणि मधुवय्याने सरंजामशाही राजवटीत जे काही केलं.त्यांच्या बलिदानातूनच बसवक्रांती होवून एका नव्या युगाला प्रारंभ झाला.हे विसरता येत नाही.हरळ्या हा जातीने चांभार जरी असला तरी संताच्या रांगेत तो पहिला संत आहे हे मानावेच लागेल. संत हरळ्या