सत्व परीक्षा - भाग ४

  • 6.9k
  • 1
  • 4.8k

परवाचा दिवस कधी येतोय असे दोघांना पण झाले होते. कारण दोघांना पण एकमेकांना बघायची ओढ लागली होती. रुचिरा ची आई रुचिरा ला म्हणाली, " रुचिरा साडीच नेस ग परवा. " रुचिरा, " ठिक आहे आई. " कोणती साडी नेसायची असा विचार ती करू लागली. राणी कलरची खणाची साडी नेसायची तिने ठरवले. बघता बघता परवाचा दिवस उजाडला. घर छोटसं होतं पण टापटीप आणि नीटनेटके होते. मावशीने घर छान असं सजवलं पण होतं. चाळीतले घर असले तरी ते सुंदर होतं. माळ्यावर जाण्याचा जीना पण गोल बसवून घेतला होता. त्यामुळे घराला एक वेगळाच लूक आला होता. मावशीने अनिकेत ला येताना मिठाई चा बॉक्स,