मल्ल प्रेमयुद्ध - भाग 24

  • 6k
  • 3.8k

मल्ल प्रेमयुध्ददोघे बराच वेळ फक्त बसून होते. "वीर थँक यु..." तिच्या डोळ्यात दिसणारे भाव वीर वाचत होता. बराच वेळ तिच्या डोळ्यात तसाच बघत होता. तिला लाजल्यासारखे झाले तिने उगीचच खाली बघून स्वतःच्या ओढणी हातांच्या बोटाना गुंडाळू लागली."का खाली बघताय??? लै दिवस झाले सांगीन म्हणतोय... तुमच्या डोळ्यात जादू हाय... तुमच्या डोळ्यात अस काय हाय की मी स्वतःला सुद्धा ओसरून जातो." क्रांतीने एक नजर वीरकडे बघितलं. तिच्याकडे यापूर्वी अनेक मुलांनी बघितलं होत पण वीरच्या बघण्यानं ती विरघळून गेली होती. तिला समजतच नव्हते की काय बोलावे."निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्याल... " क्रांती"काय म्हणालात का? " वीर"म्हंटल निघायला पाहिजे... घरी वाट बघत असत्यात."