शेतकरी जादूगारच

  • 3.6k
  • 1
  • 1k

शेतकरीही चमत्कार करतो ; त्यालाही दान द्या *अलिकडे लोकांना शेतीचं महत्व कळेनासं झालंय. त्याचं कारण म्हणजे शेतीचं होत असलेलं नुकसान. लोकांना मात्र शेतीशी व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. ते शेती करणाऱ्या लोकांना कधीच मदत करणार नाहीत. उलट त्यांना त्रास देतात व त्यांना मदत करतात की जे व्यापार करतात. लोकं थेट माल शेतकऱ्यांकडून घेत नाहीत. ते व्यापाऱ्यांकडून घेतात. जो शेतकऱ्यांकडून कमी दामात म्हणजेच अतिशय लाजिरवाण्या भावात माल विकत घेतो. त्याला साफ करायला मजूर लावतो. स्वतः अंगानं काम करीत नाही. फक्त हुकूम चालवतो आणि तो माल स्वच्छ व साफसुथरा झाल्यावर जास्त दामात विकतो आणि आपण मुर्खासारखे शेतकऱ्यांना दोन पैसे