कोण? - 1

  • 20.8k
  • 1
  • 14.7k

भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही.