तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 1

  • 10.5k
  • 5.1k

आज तिचा जॉब चा पहिलाच दिवस होता अन तिला पोहचायला late झाला होता.... शोरूम आलं ,तशी ती ऑटोवाल्याला पैसे देऊन उतरली...अन थोडं पळतच शोरूम मध्ये पोहचली... तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, अन काळजी ही दिसत होती...केस व्यवस्थित करत ती आत आली, तर समोर Reception वरचे सगळे तिलाच पाहू लागले... ती सगळ्यांना इग्नोर करून निघाली. reception वर चौकशी केली तर थोडा वेळ वाट पाहायला सांगण्यात आले...तशी ती तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसली... थोड्यावेळाने तिला आत बोलवलं गेलं.... "मे आय कम इन सर..." ती थोडी घाबरतच बोलली "येस..." आतून रुक्ष असा आवाज आला तशी ती आत गेली. "सीट..." ती खुर्चीवर बसली अन चेहऱ्यावरचा घाम