पुनर्विवाह - भाग १

  • 13.8k
  • 1
  • 8.4k

ही कथा पुर्णतर्ध: काल्पनिक आहे याचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नाही जर आढळला तर निव्वळ योगायोग समजावा.माझ्या कल्पना शक्तीला सुचलेली ही कथा आहे. भाग १ रात्री चे दोन वाजले तरी अजय घरी आला नव्हता त्याची बायको स्वाती त्याची वाट बघत बसली होती. अजयची लेट येण्याच्यी ही काही पहिलीच वेळ नव्हती.मित्रां बरोबर पार्टी असली की, असाच त्याला उशीर व्हायचा .‌पण स्वाती त्याची वाट बघत बसायची. फोन लावून त्याला विचारावे असे तिला वाटलं पण तो विचार तिने झटकून टाकला कारण तो बाईक घेऊन गेला होता. अजय कधीतरीच घ्यायचा . वाट बघता बघता तिचा डोळा लागला. अजय मित्रांना बाय करून निघत होता .