तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 2

  • 7.4k
  • 4.1k

आज महिना होत आला होता गौरीला जॉईन होऊन, पण ती जास्त कोणाशी बोलत नव्हती... जिया ही तिथेच कामाला होती...गौरीच्या शेजारच्या टेबलवर ती असायची, ती मात्र जाम बडबडी होती... आणि गौरीला मिसळून घेऊ पाहत होती.....गौरी मात्र सगळ्यांपासून लांब राहू पाहत होती. गौरी दुपारचा टिफिन आणत नसे, सगळे जेवायला गेले तरी ही तिथेच बसून असायची....काम मात्र परफेक्ट असायचं तीच. पंधरा दिवसांतच तिने सगळं काम समजावून घेतले होते. सर अन मॅनेजर दोघे ही तिच्या कामावर खुश होते, पण तिची वागणूक पाहून सगळ्यांना अस वाटायचं की तिला खूप घमंड आहे. ती जास्त मिक्स होत नाही हे पाहून विकी विचारात पडला . "नेमका हिला प्रॉब्लेम