निसर्ग - सर्वात शक्तिमान - भाग 1

  • 3.9k
  • 1
  • 1.5k

जंगलामध्ये एक भलामोठा वृद्ध वृक्ष होता ज्यावर वीज कोसळल्यामुळे तो जळून गेला होता. वृक्षाच्या खोडावर वीज पडल्यामुळे तो खोडातून दोन भागात विभागला होता. त्याचा वरील भाग एका बाजूला कोसळला होता व त्याचे रुंद खोड जमिनीवर उभे होते जे जळल्यामुळे आतून पोकळ झाले होते. कालांतराने खोडाच्या चारही बाजूला वेलींनी विळखा घातला होता. त्याच्या वरील बाजूला वेलींचा पूर्ण विळखा होता ज्यामुळे सूर्यप्रकाशाला आत प्रवेश करण्यास मनाई होती. त्याच्या एका बाजूला भगदाड होते जिथे वेलींचा विळखा विरळ होता, तिथून खोडाच्या आत-बाहेर करणे शक्य होते. अबिद्युत (नर सिंह) व कार्मा (मादी सिंह) या सिंहाच्या जोडप्याने त्या खोडाला त्यांची गुहा बनवले होते ज्यामध्ये ते त्यांचे