रंग माझा वेगळा

  • 16.5k
  • 5.9k

एकदा जंगलात सिंह महाराजांनी पक्ष्यांसाठी रंग माझा वेगळा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात सगळ्या पक्षांनी भाग घेतला होता. कावळा,मैना,कोकिळा,बगळा,बदक,हंस,शहामृग, मोर,पोपट, कबुतर, चिमणी, सुतारपक्षी अगदी झाडून सगळ्या पक्षांनी भाग घेतला.पहिल्या फेरीत सगळ्या पक्षांनी आपापल्या गुणांचं वर्णन केलं.कावकाव करत कावळा आला,कावळा:--- मी जरी असलो काळा, तरी अंगी आहे नाना कळा,काक स्पर्श करण्यासाठी जो तो मला शोधत फिरतो आणि होतो बावळा.उडत उडत मैना आली,मैना:--- मी आहे बाई काळी पण चोच माझी पिवळी आणि माझ्या नावाचे बालगीत ऐकून लहानग्यांची खुलते कळी.रियाज सोडून कोकिळा आली,कोकिळा:---असेल जरी वर्ण माझा काळा परी दिला देवाने गोड गोड गळा, मी गायलेल्या गाण्याचा सर्वांना भलताच लळा.जपमाळ सोडून बगळा आला,बगळा:---