मल्ल प्रेमयुद्ध - भाग 28

  • 5.3k
  • 3.1k

मल्ल प्रेमयुध्द संध्याकाळ झाली होती. वीर स्वतः आज गुरांच्या गोठ्यात गेला. प्रत्येकवर त्याचा जीव होता. प्रत्येकाला त्याने वेगवेगळी नावं ठेवली होती त्याच्या आवडीची.... खरं तर हे सगळं रघुदादा बघायचा. रघुदादा गुरांना वैरण घालत होता, पाणी देत होता.गोठा अगदी स्वच्छ... मुक्या प्राण्यांना बोलता यत नाय म्हणून घाणीत ठेवायचं का? असं वीर म्हणायचा. आठवड्यातून दोनदा तरी तो गोठ्यात जायचा, कारण आबासाहेबांच्या प्रगतीला या सगळ्यांची मदत झाली होती. अगदी नीटनेटकं सगळ्यांना व्यवस्थित जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटची सोय सगळं व्यवस्थित होतं. आज त्याची लाडकी गाई "निरा" तिच्याजवळ तो उभा राहिला. निराने त्याला बघितलं आण त्याच्या हाताला चाटायला लागली. वीरच्या डोळ्यात पाणी आलं. "निरा