यद्यपी शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम

  • 3.2k
  • 1k

अर्थ: जरी तुमचं आचरण शुद्ध असेल आणि विचार शुद्ध असतील तरीसुद्धा तुमच्या वागण्यातून वेगळा अर्थ निघत असेल, सामाजिक सांस्कृतिक नियमांचं उल्लंघन होत असेल, तुमचं वागणं गैरसमज निर्माण करणारं असेल तर असं करू नका आचरणात आणू नका. कथा:- ऋचा आणि ऋत्विक हे बाहेर रेस्टॉरंट मध्ये त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त जेवायला आले होते. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत ते ऑर्डर येण्याची वाट बघत बसले होते. ऋत्विकने दोघांच्याही आवडीचे पदार्थ मागवले होते. एकंदरीत ते दोघेही खूप खुश होते. जेवणानंतर त्यांचा एखादा सिनेमा बघण्याचा प्लॅन होता. ऋचा ऋत्विकला काहीतरी सांगतच होती तेवढ्यात ऋत्विकच्या खांद्यावर कोणीतरी जोरात थाप मारली त्याने लगेच वळून बघितलं. "अरे बोक्या