मोबाईलचा शिक्षणात वापर?

  • 4.2k
  • 1
  • 1.7k

शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलचा वापर? अलिकडे मोबाईलचा वापर लोकं करीत असलेले दिसतात. त्यातच शाळेतील शिक्षकही सुटलेले नाहीत व विद्यार्थीही सुटलेले नाहीत. मोबाईलचा जसा शोध लागला. तशी क्रांती झाली. कारण मोबाईलचा शोध म्हणजे एक चमत्कारच. एका मानवानं दगडाला वाचा फोडण्यासारखा चमत्कार. आज याच मोबाईलच्या प्रकारातून स्मार्टफोन आला व आज हा स्मार्टफोन एवढा लोकप्रिय झाला की जो तो हा स्मार्टफोन आज वापरायला लागला आहे. मोबाईलच्या या वापरातून पुर्वी शिक्षकांवर बंदी घालण्यात आली होती. त्याचं कारणही तसंच होतं. हा स्मार्टफोन नवीन नवीन निघाल्यानं शाळेतील शिक्षकवर्ग शाळेतच विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी सारखा मोबाईल पाहात राहायचे. ते जेव्हा निदर्शनास आलं. त्यानंतर मोबाईल वापरावर शिक्षकांवर बंदी घालण्यात आली