रक्षाबंधन

  • 3.8k
  • 1.5k

कृष्णा सारखं घरातून आत-बाहेर येरझाऱ्या घालत होती, मधून मधून अंगणात येऊन बघत होती. ‘अरे केशव अजून आला कसा नाही ? एव्हाना यायला पाहिजे होता’. असा ती विचार करतच होती तेवढ्यात केशव त्याच्या बाईक वरून येताना दिसला. आज रक्षाबंधन असल्यामुळे केशव कृष्णाकडे राखी बांधून घ्यायला आला होता. ‘माऊली’ बालकाश्रमात असल्यापासूनच कृष्णा-केशवने पक्क ठरवून टाकलं होतं की आपल्यामधील बहीण-भावाचं नातं कधीच विसरायचं नाही,अगदी बालकाश्रमातून बाहेर पडल्यावरही हे बंधन तुटू द्यायचं नाही. कृष्णाचा आठवा वाढदिवस होता तेव्हा श्री व सौ पाध्येंनी तिला रीतसर दत्तक घेतलं होतं. बालकाश्रमाचा शेवटचा निरोप घेत असताना कृष्णा केशव ला शोधत होती,तेवढ्यात आश्रमाच्या अंगणातून केशव धावत तिच्याकडे आला. कृष्णाला