करामती ठमी - 1

  • 13.2k
  • 6.7k

ठमी ही माझी आत्ये बहीण आहे आणि आम्ही एकाच वयाचे असल्याने एकाच वर्गात शिकतो, एकाच बाकावर बसतो. माझ्यात आणि ठमी मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे मी उंच रोड सावळी स्वभावाने शांत आहे तर ठमी अगदी त्याच्या विरुद्ध ठेंगणी सुदृढ गोरी आणि चळवळी आहे. एवढ्या विरुद्ध स्वभावाच्या असलो तरी आम्ही कशा काय न भांडता सतत एकत्र असतो असा मलाच काय आमच्या दोघींच्या आईवडिलांसकट सगळ्या नातेवाईकांना शेजारच्या पाजारच्यांना आजपर्यंत उलघडा झाला नाही.तिच्या आणि माझ्या स्वभावात कसा फरक आहे हे ह्या उदाहरणावरून कळेल.शाळेतून येताना रस्त्यात आम्हाला एक खोकडं पडलेलं दिसलं. मी पायाने ते रस्त्याच्या कडेला लावून ठेवलं. ठमीच्या डोक्यात मात्र काय आलं