शापित नदी सरस्वती - 2

  • 3.6k
  • 1
  • 1.6k

पुढे सुरु शापीत नदी भाग तो अर्थसंकल्प........त्या वर्षी अमोलनं लोकसभा अध्यक्षांच्या मागे लागून लुप्त झालेल्या सरस्वती नदीसाठी अर्थसंकल्पात काही पैशाची तरतूद करुन घेतली होती. ती तरतूद......ती तरतूद पाहिजे तेवढ्या स्वरुपाची नव्हती. त्या तरतूदीची रक्कम कमी होती. ती एवढी कमी होती की की त्या रकमेनं केवळ सरस्वतीचं नावच तपासता आलं होतं. अमोलला शोधकर्त्यांनी सांगीतलं की सरस्वती जेव्हा प्रकट झाली असेल, तेव्हा ती सात प्रवाहानं प्रकट झाली असेल. तिचं उगमस्थान एकच असेल. परंतू तिचे एकाच ठिकाणाहून सात प्रवाह निघत असतील व तिचे एकाच ठिकाणावरुन सात प्रवाह निघत असल्यानं तिच्या सातही प्रवाहाला तिचंच नाव देण्यात आलं असावं. ती सातही ठिकाणी वाहात असावी तिच्याच