नागार्जुन - भाग ४

  • 4.5k
  • 2.2k

" हं चला आता लाईन मध्ये बसा मोठे...आणि राखी बांधून घ्या..." सुरभी सर्व खाली जमताच बोलते,तिने व लाचो ने ओवाळणी ची तयारी आधीच केली होती...सोबत प्रितो ही होतीच...पण या घरची एकेकाळची लाडकी बहिण, कोमल..किट्टू मात्र जरा दुरच उभी होती...कारण तिथे अर्जून ही होता... " नील भैय्या...आधी तुमचा मान...तुम्ही बसुन घ्या..." लाचो नील ला बोलते तसं ते हसुन मान डोलवतात आणि सुरभी कडून टोपी घेत तिथेच असलेल्या पाटावर जाऊन बसतात...तसंही लाचो ही हसत त्यांचं औक्षण करते व राखी बांधते... " आपले उत्सव मुर्ती कुठे गेले...?? ना फोटो नाही , ना दंगा नाही..." तोच डोक्यावरती हात ठेवून असलेले नील ,सर्व ठिकाणी एक