सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 2

  • 5.3k
  • 2.7k

सहासी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे २ . आजोबांच्या पायावर पाल्याचा लेप दिल्यावर जानकी व शाम दोन घोडे घेवून वाड्यातून बाहेर पडले. वेळ पडली तर प्रतापराव स्वतःच रक्षण करतील या विषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.सार बेट अंधारल होत.आकाशात पश्चिमेला शुक्राची चांदणी उगवली होती.जानकी हातात दिवटी पकडून घोडा हाकत होती .त्या पाठोपाठ शाम कमरेला तलवार व खांद्यावर धनुष्य बाण लटकवून चालला होता.दोघेही सावध होती पण तेवढीच घाई पण करत होती.आजोबांच्या अंगात बाणाला लावलेले विष पसरु नये हिच प्रार्थना दोघ करत होती. दोघांचेही डोळे व कान सावधतेने परिसरातील बदल टिपत होते. रातकिडे किर्र- किर्र करत होते.मध्येच घुबड घुमल्यासारखा आवाज येत होता.