पुनर्विवाह - भाग ३

  • 7.6k
  • 5.2k

स्वाती ला आता खंबीर बनणे गरजेचे होते. अजय ला जाऊन बारा ‌दिवस झाले होते. आज त्याचे बारावे होते. स्वाती ‌ला‌ खूप एकटे वाटत होते ‌. सगळेजण तिच्या दुःखा च्या प्रसंगात तिच्या सोबत होते तरीसुद्धा ती एकटीच होती. कारण जोडीदारा ची साथ ही वेगळी च असते.आपलं सारं दुःख तिला आता मनाच्या तळाशी गाडून टाकायचे होते. आठवणी आयुष्य भर येणारचं होत्या.‌पण छोट्या सुदेश साठी तिला आता खंबीर बनावच लागणार होतं.तिचं जाॅब करण्याचा निर्णय तिच्या भावाला फारसं आवडले नव्हते. तिच्या दिराला पण आवडले नव्हते. ते दोघे मिळून दर महिन्याला एक ठराविक रक्कम तिला देणार होते. पण तिने त्या दोघांना ही समजावलं की, तुम्हा