तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 3

  • 7.2k
  • 1
  • 3.6k

विकीने गौरीला रेल्वेस्टेशनवर पाहिले, तो तिच्याशी बोलण्यासाठी जाणार होता की, मध्ये रेल्वे आली आणि पुन्हा ती त्याला दिसली नाही. थोड्यावेळातच निल ही आला व विकी ही घरी निघून गेला.दुसऱ्या दिवशी विकी गौरीला शोधत आला. ती अजून शोरूममध्ये आली नव्हती. शोरूमच्या मागेच कंपनीचे वर्कशॉप होते. तो तिथे ही बघून आला. पण ती कुठे दिसली नाही. तो नाराज झाला आणि पुन्हा आपल्या डेस्ककडे जाण्यासाठी वळला की समोर गौरी येताना त्याला दिसली.तो तीच्याशी बोलण्यासाठी जाणारच होताच की त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर बॉस नाव झळकत होत तस तो बॉसच्या केबिन कडे गेला.सरांशी बोलून तो बाहेर आला. पण आता त्याच्या हातात दोन फाईल्स होत्या ज्या