करामती ठमी - 3 - ठमीची फोटोग्राफी

  • 6k
  • 3.3k

गायनाच्या क्लास चं ते तसं झालं आणि ठमी ला रिकामा वेळ खायला उठला. तिचं चलवळं डोकं तिला शांत बसू देईना तिला हळूहळू फ्रस्ट्रेशन यायला लागलं. परंतु हे तिचं फ्रस्ट्रेशन फार काही टिकलं नाही. त्याचं झालं काय की माझे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या आत्याला द्यायला असे दोन डिजिटल कॅमेरे आणले. त्यामुळे घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याचा ताबा ठमीच घेणार ह्या नियमाने तिने तो कॅमेरा आत्याच्या हातून अक्षरशः ओढून घेतला. मग काय दिवसभर कुठले न कुठले फोटो ती काढू लागली. त्या कॅमेराने अनेक लपलेल्या बाबी तिने उघडकीस आणल्या. दुधवाल्या गणूकाकाकांचा इकडे तिकडे बघत भररकन