करामती ठमी - 4 - ठमीची पाककला

  • 6.3k
  • 3.1k

मागच्या प्रकरणात आपण बघितलं च आहे की कॅमेरा घेऊन ठमीने खूप करामती केल्या त्यामुळे आत्याने तिच्या हातातून कायमचा तो काढून घेतला. पण शांत बसेल ती ठमी कुठली! तिला अचानक पाक कलेत रुची निर्माण झाली. रोज ती दुपारी एक दीड वाजता आवर्जून टीव्ही वर पाक कलेचे कार्यक्रम बघू लागली. हातात वही पेन घेऊन त्यातील साहित्य कृती लिहून घेऊ लागली. "आई मी रोज बघते तू खूप कामं करते, घरासाठी खूप राबते(आत्याला कळेचना की ठमी एवढी कशी काय शहाणी झाली)त्यामुळे मी ठरवलंय की एक आठवडाभर तुला कूकिंग पासून सुट्टी द्यायची. " "आणि मग कोण स्वयंपाक करणार आठवडाभर?",आत्या ने विचारलं. "कोण करणार काय? ऑफकोर्स