दृढ इच्छाशक्ती

  • 7.1k
  • 2.6k

दृढ इच्छाशक्ती म्हणजे कुठलेही ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा आणि त्यासोबत केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. मी अमुक अमुक होणारच, मी ह्या संकटातून सही सलामत सुटणारच, मी माझ्या आजारावर विजय मिळवणारच,मी वैज्ञानिक,वैमानिक,डॉक्टर,शिक्षक इत्यादी होणारच, अशी जी प्रबळ इच्छा असते ती त्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत निश्चित पोचवते. कितीही संकटं आले, कितीही अडथळे आले तरीही दृढ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती निराश होत नाही, प्रयत्न करणं सोडत नाही. काही पायाने अधू व्यक्तींनी दृढ इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे, काही हातांनी अधू असलेल्या व्यक्तींनी पायाने कुंचला पकडून इतके अप्रतिम चित्र काढले आहेत ज्याला तोड नाही. अनेक थोर पुरुषांनी त्यांच्या बालपणी खूप कष्ट घेऊन, अनेक अडचणींवर मात