राधा प्रेम रंगली - भाग २

  • 7.5k
  • 4.2k

" गुलाबाची फुलं घ्या ना ताई...तुमच्या नवर्याला ..." मुंबई च्या एका सिग्नल वर एक बारा वर्षांची मुलगी गाडीतल्या एका बाईला आपल्या हातातील गुलाबाची फुले देऊन ते विकत घेण्यासाठी मजबुर करत होती... " ऐ पोरी, पुढे जा...आम्हांला नाही घ्यायचं ..हो बरं पुढे..." ती गाडीतील महिला तिच्यावर खेकसत बोलते..पण तरी ही ती छोटी मुलगी दटून तिला ते फुल घेण्यास प्रवृत्त करत होती... " एकदा सांगितलेलं कळत नाही का...जा म्हणून..." आता तर गाडीतला ड्रायव्हर ही तिच्यावर ओरडतो आणि त्याचवेळी सिग्नल सुटतो...ती मुलगी गाडीखाली जाणार कि इतक्यात तिला एक जण खसकन तिच्याकडे ओढतो आणि रस्त्याकडच्या दुसर्या बाजुला नेतो. " ऐ पोरी मरायच आहे का..??