वंशाचा दिवा

  • 6.4k
  • 1
  • 1.9k

"आज शांताबाई खूप रडत होती, घरी जेव्हा कामाला आली होती तेव्हा",शांभवी "का काय झालं?",वैष्णवी "अगं तिच्या जावयाने तिच्या मुलीला घराबाहेर काढलं",शांभवी "पण का??",वैष्णवी "अगं तिला आधीच तीन मुली आहेत आणि चौथ्यांदा ती गरोदर आहे आता तिचा नवरा म्हणतो की सोनोग्राफी करू आणि मुलगी असली तर abortion करून टाकू म्हणून. हे शांताबाईंच्या मुलीला शीला ला मान्य नाही आणि तिच्या नवऱ्याला तर वंशाचा दिवा हवाच आहे.",शांभवी "बापरे! फारच कठीण आहे! मुलगा हवा म्हणून मुलीचा गर्भ संपवून टाकायचा! फारच रानटी आणि अडाणीपणा आहे हा.",वैष्णवी "नाहीतर काय! मुलगा असो की मुलगी जे नैसर्गिकरित्या मिळतेय ते स्वीकारायचं त्यात अजून कुठे आपली आवड आणि निवड घुसडायची!