सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 4

  • 6.1k
  • 3k

शाम झाडावरच्या झोपडीवर सोनपिंगळ्या सोबत होता तेव्हा जानकी होडी घेवून कोळ्यांच्या प्रमुखाला भेटायला गेली होती. सखाराम किंवा दादू कोळी हा कोळ्यांच्या प्रमुख होता. जानकीला पाहून तो अदीबीने उभा राहिला. " ताईसाब,आपण एवढ्या सकाळी?" " होय, काका आम्हाला यावं लागलं. आजोबांवर काल हल्ला झाला..." " काय ? प्रत्यक्ष रावांवर हल्ला ! कोणी हे धाडस केलं?" " खड्गसिंगाने... म्हणूनच मी आलेय.काका कधी तुमची मदत लागली तर मी तुम्हाला वाड्याच्या गच्चीवरून इशारा देईन." " एक हाक मारा, आम्ही लागलीच धावत येऊ. खड्ग सिंगांच्या कारवाया वाढल्यात त्याला धडा शिकविणे गरजेचे आहे." " आजोबांनी, आपल्या राजाला कळविले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.आता आपल्यालाच