अनामिका - एक शोध

  • 6.5k
  • 1
  • 2.5k

सकाळची वेळ सुमा ने टेबल वर चहा आणि डिश ठेवत हाक दिली "अना ब्रेकफास्ट कर उपाशी नको जाऊस काल पण उपाशीच केलीस " आपली बॅग पकडत अना म्हणाली "आई मला उशीर होत आहे मी निघते" हे ऐकून आई ओरडली "काय ग हे अना कामा शिवाय तुला काहीच कसे सुचत नाही का आज पण उपाशीच जाणार आहेस आरोग्याशी हेळसांड करू नकोस " गाडीची चावी घेत अना म्हणाली "आई येते मी" तेव्हड्यात आईने तिला थांबवले "थांब मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे " घड्याळात पाहत अना म्हणाली "आता नाही आई संध्याकळी पाहू" असे म्हणत अनामिका म्हणजे अना आपली गाडी स्टार्ट करून निघून गेली