शिकवणं एक कसरत

  • 2.4k
  • 693

शिकवणं एक कसरतच आहे? एका वर्गात एका विद्यार्थ्यांची आई आली. म्हणायला लागली की सर माझा मुलगा घरी ऐकत नाही. अभ्यास करीत नाही. त्याला वळण लावा. त्यावर शिक्षकानं म्हटलं की थोडसं मारलं तर चालेल काय? तशी ती स्री म्हणाली, 'होय' त्यावर शिक्षक म्हणाले, 'आणि समजा एखाद्या वेळेस दुखापत झालीच मारण्यातून तर. तसा मी काही तुमच्या बाळाचा शत्रू नाही. परंतु कधीकधी मारतांना किरकोळ स्वरुपात लागतंच. दुखापतही होतेच. तर ते तुम्ही सहन करु शकाल काय?' त्यावर ती स्री त्यावर गप्प झाली. अलिकडील काळात शिकविण्यात तशी कसरतच आहे. कारण पटसंख्याच तुटत चाललीय. कसं शिकवावं ते कळत नाही. आता कितीही चांगलं शिकवलं तरी शिकविण्याला नावबोटं