वासना

  • 7.8k
  • 2
  • 3k

वासना (कादंबरी)मनोगत साहित्य विश्वातील माझी 'वासना' नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना आनंद होत आहे. या कादंबरीत मी साहित्यविश्वाला बोध देवू पाहात आहे. तो बोध म्हणजे जगात तंत्र, मंत्र, साधना व अंधश्रद्धा नाहीत. म्हणून त्यावर कोणीही विश्वास करु नये. तसेच त्याचा यु ट्यूब माध्यमातून प्रचार प्रसार करु नये. या कादंबरीत एक युक्ती नावाची मुलगी. जी सुरेश नावाच्या व्यक्तीवर प्रेम करते. परंतू त्याचेकडून धोका मिळताच ती त्यासाठी तंत्र मंत्र शिकते. त्या तंत्र मंत्रांचा वापर करुन ती आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. परंतू ती खरंच तंत्रामंत्रात यशस्वी होते का? ती तंत्रा मंत्रानं काय करते?खरंच तंत्र मंत्र आजच्या जीवनात खरं असते का की