मल्ल प्रेमयुद्ध - भाग 32

  • 5.7k
  • 3k

मल्ल- प्रेमयुध्द आबा वीरच्या लहानपणीचे अल्बम बघत होते. लहानपणापासून मिळालेल्या ट्रॉफी, इनाम, प्रत्येकवेळी ज्या ज्या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेसाठी गेले त्या सगळ्यांचे आबांनी फोटो काढून ठेवले होते. लहानपणी आबांच्या गाडीत वीर ऐटीत बसायचा. त्यावेळी फक्त गावात आबांची गाडी होती. अस एकदाही झाले नाही की वीर कुस्ती न जिंकता गावात आला. "तिथेही सतत बाप लागायचा. आणि आता पोर एक पोरीपायी बोलायला लागलं. आबांकड डोळ वर न करता बोलणारा हा पोर बोलतोय आता. म्हणजे मला ह्या पोरांच्या मनातलं समजत नव्हतं व्हय? खरच समजलं न्हाय मला?"मामा... आत येऊ...?" स्वप्ना म्हणाली."व्हय या की स्वप्ना..." आबा वीरच्या फोटोकडं बघत बोलले."आबा.." स्वप्नाने डोळ्यात पाणी आणले."आव कशापायी रडताय...