हा खेळ जाहिरातींचा

  • 9.4k
  • 3.2k

एका खेड्यात बबनराव तिरशींगे नावाचा माणूस राहत असे. गमतीदार नावा प्रमाणेच त्याचा स्वभाव ही गमतीदार होता. गावात सगळेजण त्याला बबन्या म्हणून हाक मारत असत. तब्येतीने हडकूळा,उंच , गाळफड बसलेले असे एकंदरीत बबनराव चे ध्यान होते. बबन राव च लग्न होऊन जेमतेम धा वर्षे झाली होती. बबन्याची बायको त्याला साजेशीच होती(लग्न झालं तेव्हा) पण धा वर्षात तिला हवी तशी फिगर ची काळजी घेता आली नव्हती त्यामुळे आता मुरमुर्याचे पोते कोणते आणि सौ ठमी बबनराव तिरशींगे कोणत्या याचा जरा कनफ्युजन चा गोंधळ उडत असे. बबनरावचा मुलगा 'डबल्या' यंदाच्या पोळ्याला आठ वर्षाचा झाला होता. एकंदरीत असा त्यांचा छोटा संसार मोठया गुण्यागोविंदाने सुरू होता.