तुझ्यावाचून करमेना - 2

  • 8.4k
  • 1
  • 3.7k

अक्षय आज मुंबईला जाणार होता. मायाताईंची गडबड चालू होती. अक्षय हे घेतलंस का? अक्षय लाडवांचा डबा भरलास का? असं बडबडत त्यांची कामं चालूच होती. किरणराव ही अक्षयला मदत करत होते. अखेर अक्षयची जायची वेळ आली. मायाताई थोड्या भावनिक झाल्या. तस पहिल्यांदाच तो एकटा बाहेर जाणार होता नाहीतर लहान म्हणून त्या जायच्या बरोबर. "काळजी घे रे बाळा." "हो गं आई काळजी नको करुस."असं म्हणत तो बाहेर पडला. मायाताई किरणरावांना म्हणाल्या, " खर सांगू तुम्हाला मी अशी मुली बघायची घाई का करत होते? त्याला कोणीतरी आपलं मिळावं जे त्याला समजून घेईल. बस नाहीतर मी कशाला त्याच्या करिअरच्या आड येईन? दिप्तीला तर त्याने