मल्ल प्रेमयुद्ध - भाग 35

  • 7.4k
  • 3.5k

मल्ल प्रेमयुद्ध गुगल मॅप नुसार गाडी धावत होती. संतुने गाडी अकॅडमीच्या पुढे थांबवली सगळ्यांनी खालूनच नाव वाचलं "फायटर पॉईंट ॲकॅडमी" बिल्डिंग, मैदान खूप मोठं होतं. बाहेरूनच एवढ मोठं दिसत होत. क्रांती आणि रत्नाने एकमेकींकडे बघितले. त्यांच्या मनात भीती होती. दोघींनी बिल्डिंगकडे बघून डोळे विस्फारले आणि आत निघाले. क्रांतीने स्वप्नाचा निरोप घेतला. म्हणाली, काळजी घे... तू नको तू खाली उतरू, तुझा पाय दुखतोय.." भूषण म्हणाला, " मी थांबतो यांच्याजवळ तुम्ही जा." वीरने त्याची गळाभेट घेतली. भूषणने. गाडी मधून सामान काढून दिलं सगळ्यांचं आणि भूषण स्वप्नाली गाडीतच बसले. बाकी सगळे उतरून सामान घेऊन अकॅडमीच्या दिशेने गेले.भूषण ने गाडी एका झाडाखाली लावली. त्याने