मल्ल प्रेम युद्धसंध्याकाळचे सात वाजले होते. रत्ना आणि क्रांतीने त्यांची रूम व्यवस्थित आवरून ठेवली. कपाटामध्ये दोघींच्या बॅग लावून ठेवल्या. आवरून दोघी बसल्या होत्या तेवढ्यात वीरचा क्रांतीला फोन आला. "सगळं व्यवस्थित झालं ना?" क्रांतीला काळजीने विचारत होता. तेवढीच काळजी क्रांती वीरची जरात होती. वीरचीसुद्धा व्यवस्थित रूम लावून झाली होती, अर्थातच सगळ्यांनी मदत केली म्हणूनच वीरची रूम लवकर आवरून झाली होती. सकाळी लवकर उठायचे असे सांगून वीरने फोन ठेवून दिला. क्रांती आणि रत्नाच्या रूमच्या दरवाज्यावर नॉक झाले. जेवायची वेळ झाली होती. जेवढ्या मुली होस्टेलवर राहायला होत्या. तेवढ्या सगळ्या दरवाजात उभ्या होत्या. सगळ्यांची तोंड ओळख झाली होती पण सायलीने परत सगळ्यांची ओळख करून