मर्डर वेपन - प्रकरण 8

  • 5.4k
  • 1
  • 3.1k

मर्डर वेपन प्रकरण ८ रिसेप्शनिस्ट गती ने पाणिनी ला फोन केला आणि सांगितलं की नंदर्गीकर नावाची स्त्री बाहेर आल्ये आणि खासनीस ला द्यायला तिने एक पाकीट आणलंय. “ पाठव तिला आत.” पाणिनी गतीला म्हणाला. नंतर खासनीस ला म्हणाला, “ तू तिचा ज्या प्रकारे उल्लेख केलास त्यावरून ती अविवाहित असेल असं मला वाटलं होतं, उगाचच.” “ नाही विवाहित आहे ती. ” खासनीस म्हणाला. “ जरा दुख:द घटनाच आहे तिच्या बद्दल.” “ विधवा आहे?” पाणिनीनं विचारलं “ नाही, घटस्फोटित.” खासनीस म्हणाला. “ एक दिवस संध्याकाळी तिचा नवरा ऑफिसातून परत आलाच नाही.त्यानंतर तिने त्याला कधीच पाहिलं नाही. नंतर तिने घटस्फोट घेतला.” “ कधी