मल्ल प्रेमयुद्धक्रांती आवरून खाली आली. वीरने बाईक आणली होती. एकतर त्याला एवढा भारी बघून तिच्या काळजात धड धड होत होती. ब्लॅक टीशर्ट, जॅकेट नि ब्लु जीन्स, गॉगल अन बुलेट बापरे क्रांती जरावेळ त्याच्याकडे बघत बसली." काय बघताय??? प्रेमात पडाल हा ... अन मग म्हणाल माझं प्रेम न्हाय..." वीर हसत म्हणाला.क्रांतीने पटकन नजर फिरवली आणि एक साईडला बसली. वीर गाडी स्टार्ट करेना."काय झालं???" क्रांती "बुलेटवर अस बसत्यात व्हय.." "मग???" "दोन्हीकडून पाय टाकून बसा... चौदा किलोमीटर जायचंय तुम्हाला अवघडल्यासारखं व्हईल" वीर"एवढ्या लांब??? कुठं???" क्रांती गाडीवरून खाली उतरली."लांब न्हाय मुंबईचा समुद्र दाखवणार हाय तुमास्नी..." वीर म्हणाला. क्रांती दोन पाय दोन्हीकडून टाकून बसली. वीर