आपली शाळा मागे नाही? मराठी माध्यमातील शाळा अलिकडे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण आहे पटसंख्या. अलिकडे पटसंख्याच कमी होत आहे व शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनाचा खर्च शासनाला ओझं वाटत आहे. तसंच शासनानं अलिकडे नवीनच प्रकार आणला आहे. तो म्हणजे नवीन भरती करण्यात येणार. ज्यांना इंग्रजी अस्खलितपणे येणार. सरकारनं कॉन्व्हेंटला प्राधान्य दिलं. त्यानंतर कॉन्व्हेंट शाळेत तशा सोयी करण्यात आल्या. त्या सोयी पाहिल्या तर अलिकडे विचार येतो की आपली शाळा मागे आहे आणि ती बरीच मागे आहे. त्याचं कारण काय? त्याचे कारण आहे आपल्या शाळेची गरीबी. आपल्या शाळेत ना बरोबर संगणक आहे ना आपल्या शाळेतील मुलांसाठी खेळण्याचं साधन. ना