अजुन काही

  • 2k
  • 579

विटाळ द्वेष शत्रुत्व की अजून काही माणसाचा स्वभाव की सवय माहीत नाही. परंतु ती माणसं जशी वागतात. त्यावरुन त्यांचा स्वभाव कळत असतो. ती समाजात कशी वावरत असावी? कोणाला कशी वागवत असावी? याचं गणित त्यांच्या वागण्यावरून दिसून येतं. साधारणतः विचार केल्यास माणसांमध्ये राग, द्वेष, मद, मत्सर व लोभ भरलेला असतो. तो कमीअधिक प्रमाणात असतो आणि तो प्रत्येकच माणसात असतो. त्यानुसार तो वागतो व तद्नंतर त्यांच्या या स्वभावगुणानं त्यांच्यात अहंकाराचा जन्म होतो. मग सुडबुद्धीची भावना वाढीस लागते. प्रेमभाव वा प्रेम उरत नाही. आपुलकी केव्हाच हद्दपार झालेली असते. त्यातूनच भेदभाव, शत्रुत्व आकार घेत असतात. मग एकमेकांचे मुडदे पडतात नव्हे तर पाडली जातात. वरील