झाडांनाही नातेवाईक असतात?

  • 4k
  • 1.2k

झाडांना नातेवाईक असतात! झाडं........झाडांनाही मायबाप असतात. पती असतो आणि परीवारही असतो. असे म्हटल्यास कोणी नक्कीच वेड्यात काढतील. परंतू आपल्या डोक्यावर अधिक ताण दिल्यास नक्कीच असे वाटायला लागते की झाडांनाही मायबाप असतात. पतीही असतो आणि परीवारही. माणूस हा विचारशील प्राणी आहे. या माणसाचा जेव्हा जन्म होतो. तेव्हा त्याला माहित नसतं की त्याची आई कोणती आहे. जेव्हा ती महिला त्याला आपल्या स्तनाला लावत असते. तेव्हा त्याला कळतं की ही माझी आई असेल. त्यावेळी तो लहान असतो. त्याला कळत नसतं की आई म्हणजे काय? त्याला बोलताही येत नाही. परंतू जसजसा तो मोठा होतो. तसतशी त्याला आई समजते. तिचा स्पर्शही कळतो. त्यातच आई कोण